हॉटेलनंतर सिगारेट पिताना पुन्हा वाद उद्भवला अन् त्याने तरूणाच्या छातीत चाकू खुपसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 19:17 IST2022-04-14T19:16:47+5:302022-04-14T19:17:32+5:30

अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहे

He stabbed the young man in the chest due to old dispute | हॉटेलनंतर सिगारेट पिताना पुन्हा वाद उद्भवला अन् त्याने तरूणाच्या छातीत चाकू खुपसला

हॉटेलनंतर सिगारेट पिताना पुन्हा वाद उद्भवला अन् त्याने तरूणाच्या छातीत चाकू खुपसला

जालना : भांडणाचा राग मनात धरून एका २५ वर्षीय तरूणाच्या छतीत चाकून वार करून खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील शिरनेर येथे बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. सदानंद आबाजी वैद्य (२५ रा. शिरनेर ता, अंबड) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी गणेश बाबुराव खरात (म्हाडा कॉलनी, अंबड) याच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदानंद वैद्य व  संशयित गणेश खरात यांच्यात हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून बुधवारी सायंकाळी भांडण झाले होते. नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण मिटविले होते. त्यानंतर दोघेही एकमेकांना बोलत होते. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गणेश खरात व सदानंद वैद्य हे सिगारेट आणण्यासाठी गेले. येथे त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. त्यातूनच गणेश खरात याने सदानंद वैद्य याच्या छतीत चाकूने वार करून ठार केले. व घटनास्थळावरून फरार झाला. 

याची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन  पंचनामा केला. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पाटील,  सपोनि. पंतगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण आदींनी भेटी दिल्या. या प्रकरणी मयताचे वडील आबाजी भानुदास वैद्य यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण हे करीत आहेत.

Web Title: He stabbed the young man in the chest due to old dispute