शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीमुळे ८८ हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST

भोकरदन : तालुक्यात गत महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. या गारपिटीचा तालुक्यातील ८८ हेक्टरवरील पिकांना फटका ...

भोकरदन : तालुक्यात गत महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. या गारपिटीचा तालुक्यातील ८८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, ६२८ शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

भोकरदन तालुक्यातील मालखेडा, ठालेवाडी, इब्राहिमपूर, भोकरदन, नांजा, सुभानपूर आदी भागात १८ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली होती. यात फळबागा व हरभरा, मका, गहू, कांदा सीडस्‌चे अतोनात नुकसान झाले होते. शासनाकडून नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश मिळाल्यानंतर महसूल, कृषी विभागाकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्यात तालुक्यातील ६२८ शेतकऱ्यांच्या ८८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. यात कांदा सीड्स पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शिवाय वीज पडल्याने एकाचा मृत्यूही झाला होता. तहसील कार्यालयाकडून पाहणी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच ११ लाख ८८ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

कोट

भोकरदन तालुक्यातील ८८ हेक्टरवरील पिकांचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. याचा फटका ६२८ शेतकऱ्यांना बसला आहे. झालेल्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला असून, ११ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.

संतोष गोरड, तहसीलदार, भोकरदन