नातवास भेटण्यासाठी राजूरमध्ये आलेल्या आजीचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:27 IST2019-07-15T00:27:15+5:302019-07-15T00:27:29+5:30
भोकरदन तालुक्यातील राजूर येथील गणराज वारकरी संस्थेत शिक्षणासाठी असलेल्या नातवाला भेटण्यासाठी आलेल्या आजीचा बसच्या धडकेत मृत्यू झाला.

नातवास भेटण्यासाठी राजूरमध्ये आलेल्या आजीचा अपघाती मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथील गणराज वारकरी संस्थेत शिक्षणासाठी असलेल्या नातवाला भेटण्यासाठी आलेल्या आजीचा बसच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी राजूर बसस्थानकात घडली.
फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार (जि.औरंगाबाद) येथील नंदाबाई कचरू खाकरे (६५) ही महिला रविवारी सकाळी राजूर येथील गणराज वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या नातवाला भेटण्यासाठी आली होती. बसस्थानकात थांबल्या असता पाठीमागे येणाºया बसने (क्र.एम.एच.२०-बी.एल. २१६२) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात नंदाबाई खाकरे या गंभीर जखमी झाल्या. पोकॉ दुर्गेश राठोड व इतरांनी जखमी महिलेला उपचारासाठी जालना येथील रूग्णालयात पाठवून दिले. मात्र, जालना येथील शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दत्तू कचरू खाकरे (रा. वडोद ता.फुलंब्री) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बसचालक दिनकर दौलत दांडगे व वाहक ब्रदीनाथ शिवनाथ भालगडे या दोघाविरूध्द राजूर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.