५० वर्ष जुन्या मातीच्या घराची भेंड्याची भिंत कोसळून आजी-नातीचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 18:11 IST2018-12-04T18:08:02+5:302018-12-04T18:11:23+5:30

परतूर तालुक्यातील धामणगाव येथे एका ५० वर्ष जुन्या घराची मातीची भेंड्याची भिंत कोसळली

Grandmother n child dies in 50-year-old house collapse incident | ५० वर्ष जुन्या मातीच्या घराची भेंड्याची भिंत कोसळून आजी-नातीचा मृत्यू 

५० वर्ष जुन्या मातीच्या घराची भेंड्याची भिंत कोसळून आजी-नातीचा मृत्यू 

आष्टी (जालना ) : परतूर तालुक्यातील धामणगाव येथे एका ५० वर्ष जुन्या घराची मातीची भेंड्याची भिंत कोसळून त्याखाली दबलेल्या आजी आणि नातीचा करुण अंत झाला. प्रभावती अण्णा मठपती (५५), आदिती स्वामी (२) असे  मयतांची नावे आहेत. सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत अन्य सहाजण जखमी झाले आहेत. 

गावकऱ्यांनी शथीर्चे प्रयत्न करत मातीच्या ढिगाऱ्याखालून इतर सहा जणांना बाहेर काढले. अण्णा मठपती यांचे कुटुंब सोमवारी रात्री घरात झोपले असताना पाठीमागील मातीची भेंड्याची भिंत कोसळल्याने यात प्रभावती अण्णा मठपती व त्यांची नात आदिती नागेश स्वामी या दोघी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अण्णा मठपती त्यांच्या मुली रेखा नागेश कामठे, पुजा नागेश स्वामी, नातू शिवप्रसाद कामठे, पुजा हिचे छोटे बाळ व मठपती यांच्या सासू सुमनबाई पाडगावकर हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. घटनास्थळी मंडळ अधिकारी चाऊस व तलाठी इंगोले यांनी भेट देऊन पंचनामा केला.  या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Grandmother n child dies in 50-year-old house collapse incident