शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST

जालना : जालना जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन मिळाले नाही. त्यामुळे अधिकारी व ...

जालना : जालना जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन मिळाले नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जालना जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत तब्बल सहा हजार ६५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम पहिले. त्यांना अडीच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानधन दिले नाही. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्यांना मानधनच दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने तातडीने मानधन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

अडीच हजार रुपयांचे दिले जातेय मानधन

ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. हे मानधन तहसील कार्यालयाकडून दिले जाते. मानधन तीन टप्प्यांत दिले जाते. परंतु, यासाठी तहसील कार्यालयांकडे निधीच उपलब्ध नसल्याने मानधन दिले जात नाही. यंदाही शासनाने निधी न दिल्याने अधिकारी व कर्मचारी मानधनापासून वंचित राहिले आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीचे मानधन मिळाले

राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहा ते सात महिन्यांनंतर मानधन मिळाले आहे. परंतु, गतपंचवार्षिकला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन अद्यापही मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. ज्याप्रकारे शासन अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काम करून घेते, त्याच प्रकारे शासनाने मानधन दिले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन हे तहसील कार्यालयांकडून दिले जाते. त्यासाठी विशेष निधी सुद्धा असतो. परंतु, निधी प्राप्त न झाल्याने सदरील मानधन देण्यात आले नाहीत. प्रत्येकी अडीच ते तीन हजार रुपयांचे मानधन दिले जाते. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६६५० अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते.

राजीव शिंदे, तहसीलदार