जालना / परभणी / हिंगोली: मराठवाड्यातील जालना, परभणी आणि आता हिंगोली जिल्ह्यातही रशासनाने २५ आणि २६ मार्च रोजी इंधन विक्रीवर घातलेले सर्व निर्बंध शुक्रवारी (२७ मार्च) तातडीने रद्द केले आहेत. या निर्णयामुळे गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोलसाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पुन्हा पूर्वपदावर आली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
जालन्यात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणातजालना जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे मागणी आणि पुरवठ्यात तात्पुरता असमतोल निर्माण झाला होता. मात्र, बीपीसीएल, आयओसीएल आणि एचपीसीएल कंपन्यांकडून मुबलक साठा प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार, आता वितरणावर कोणतीही मर्यादा उरलेली नसून नागरिकांनी आवश्यकतेनुसारच इंधन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परभणीत मर्यादा मागे, पण 'ही' अट कायमपरभणीचे जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनीही सुधारित आदेश काढून दुचाकीसाठी २०० आणि चारचाकीसाठी २००० रुपयांच्या इंधन विक्रीची अट रद्द केली आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात सुटे पेट्रोल-डिझेल देण्यास असलेली बंदी कायम ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पंपांवर विनाकारण गर्दी करू नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
हिंगोलीतही परिस्थिती नियंत्रणातहिंगोलीचे अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील इंधन पुरवठा आता पूर्णपणे पूर्वपदावर आला आहे. त्यामुळे इंधन विक्रीवर लावलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जालन्यात जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आणि परभणीत विलास मुसळे यांनीही अशाच प्रकारचे सुधारित आदेश काढून नागरिकांना दिलासा दिला आहे.
अट अजूनही कायमतिन्ही जिल्ह्यांत इंधन विक्रीवरील रेशनिंग हटले असले तरी, सुरक्षिततेच्या कारणास्तव कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात सुटे पेट्रोल-डिझेल देण्यास असलेली बंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि आवश्यकतेनुसारच इंधन घेण्याचे आवाहन केले आहे.
Web Summary : Marathwada districts cancel fuel rationing imposed due to panic buying. Adequate fuel supply restored; restrictions lifted. Loose fuel sales ban remains for safety.
Web Summary : मराठवाड़ा जिलों में दहशत में खरीदारी के कारण लागू ईंधन राशनिंग रद्द। पर्याप्त ईंधन आपूर्ति बहाल; प्रतिबंध हटाए गए। सुरक्षा के लिए खुले ईंधन की बिक्री पर प्रतिबंध बरकरार।