बदनापुरात चोरट्यांनी फोडली चार दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:50 IST2019-07-17T00:49:35+5:302019-07-17T00:50:19+5:30

शहरातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी एकुण ७३५०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे़

Four shops of thieves broke out in Badnapur | बदनापुरात चोरट्यांनी फोडली चार दुकाने

बदनापुरात चोरट्यांनी फोडली चार दुकाने

बदनापूर : शहरातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी एकुण ७३५०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे़
शहरात १६ जुलै रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोवीस तास वर्दळ असलेल्या महामार्गावरील तब्बल चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून चो-या केल्या़येथील सुभाष कडुबा टकले यांच्या सार्थक कापड दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील २० पँट आणि शर्ट असा एकुण ४७ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला़ तसेच या दुकानासमोरील शेख युनुस शेख अयुब यांच्या इंडीयन आॅटोमोबाईल दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अकरा हजार रूपये चोरून नेले़ त्यानंतर शेजारी असलेल्या त्यांचा भाऊ शेख अख्तर शेख सत्तार यांच्या सुपर आॅटोमोबाईल दुकान फोडून आत प्रवेश करून गल्ल्यातील ८५०० रूपये रोख चोरून नेले़ तसेच याच महामार्गावर असलेले अमीत ताराचंद कटारीया यांच्या नवकार पेंट आणि प्लायवुडचे दुकान फोडून सात हजार रूपये लंपास केले.
पोलिसाची जीप नादुरूस्त
येथील पोलीस ठाण्याची जीप गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नादुरूत आहे. सदरील जीप दुरूस्तीसाठी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सध्या या पोलीस ठाण्याला तात्पुरत्या स्वरूपात एक जुनी मोठी व्हॅन वापरात आहे़हे पोलीस ठाणे महामार्गावर आहे. असे असतांनाही पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करत दुकाना फोडल्या आहेत.

Web Title: Four shops of thieves broke out in Badnapur