शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एकेरी वाहतुकीच्या वळणावर चार जणांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

औरंगाबाद येथून फंदाळे परिरवार हे मंगळवारी होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी सर्व ती तयारी करून वाशिमकडे जात होते. परंतु रविवारची सकाळ ...

औरंगाबाद येथून फंदाळे परिरवार हे मंगळवारी होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी सर्व ती तयारी करून वाशिमकडे जात होते. परंतु रविवारची सकाळ त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरली असेच म्हणावे लागेल. पत्नी, दोन चिमकुल्या मुलीसह १७ वर्षांच्या मामेभावासोबत गोपाळ फांदळे हे जात होते. परंतु मध्येच काळाने त्यांच्या पत्नी आणि मुलीवर घाला घातल्याने ते भावुक झाले होते. अपघातातून वाचलेले गोपाळ फांदळे हे उपचारा नंतर मुलगी आणि नातेवाइकासोबत औरंगाबादला रवाना झाल्याचे नातेवाईक हर्षद ठाकरे यांनी सांगितले.

हंबरडा फोडल्याने वातावरण गंभीर

सदरील अपघाताची माहिती औरंगाबादला कळताच गोपाळ फांदळे यांचे नातेवाईक आणि मित्र हर्षद ठाकरे, सिचन कापसे आणि अतुल वेताळ हे अपघात स्थळी दाखल झाले. माही आईसह विहिरीत बुडाल्याची माहिती हर्षदला कळताच त्याने हंबरडा फोडला. त्यामुळे वातावरण भावूक झाले हेाते. हुंदका आवरत असतांना माहीबद्दल सांगताना तो म्हणाला की, माही दररोज मला चॉकलेट आणायला सांगत, परंतु ते न दिल्यास ती हट्ट धरून बसायची. अशी आठवण सांगितली.

संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

शुक्रवारचा अपघात ताजा असतानाच रविवारी पुन्हा तेथेच आणि तसाच अपघात झाला. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यावेळी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून रखडलल्या रस्त्याच्या कंत्राटदारासह अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.

पोलिसांची कसरत

सलग अपघांमुळे अग्निशमन दल तसेच तालुका पोलीस ठाणे, महामार्ग ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन्ही अपघातात मोठे परिश्रम घेतले. अपघातानंतर संतप्त जमावाला शांत करण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी मध्यस्ती केली.