चार लाख रुपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:34 IST2019-04-05T00:33:30+5:302019-04-05T00:34:10+5:30

विविध कंपनीचा चार लाख रुपयांचा गुटखा घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे एका पिकअप व्हॅनमधून घेऊन जात असतांना सदर बाजार पोलिसांनी महेशभवन जवळ पकडला.

Four lakh rupees worth of gutka seized | चार लाख रुपयांचा गुटखा जप्त

चार लाख रुपयांचा गुटखा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना येथू खरेदी केलेला विविध कंपनीचा चार लाख रुपयांचा गुटखा घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे एका पिकअप व्हॅनमधून घेऊन जात असतांना सदर बाजार पोलिसांनी महेशभवन जवळ पकडला. हा गुटखा (एमएच-१२, केपी-३४२४) पिकअप व्हॅनमधून नेला जात होता.
या प्रकरणी चालक शेख रियाज शेख रशीद, रा. राणी ऊंचेगाव) यास ताब्यात घेतले आहे.
शहरातील सतीश (लाला) जैस्वाल याच्याकडून लाखो रुपयांचा गुटखा घेऊन पिकअप वाहनातून एमआयडीसीतून राणीऊंचेगावकडे जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चैतन्य यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून सदर बाजार पोलिसांनी महेशभवनजवळ सापळा लावून ही कारवाई गुरूवारी रात्री आठवाजेच्या दरम्यान केली.
यावेळी एकूण ६६ गोण्यातून हा गुटखा वाहून नेला जात होता. या प्रकरणी सतीश जैस्वाल आणि पिकअप चालक शेख रियाज या दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई
पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक विजय जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Web Title: Four lakh rupees worth of gutka seized