शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
6
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
7
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
8
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
9
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
10
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
11
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
12
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
13
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
14
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
15
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
16
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
17
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
18
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
19
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
20
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी न झालेल्या पाच शिक्षकांना व्हावे लागणार कंत्राटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांनी ...

शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे. त्याची नुकतीच पडताळणी झाली. यात पाच शिक्षकांचे जातीचे दावे अ‌वैध ठरले. त्यामुळे त्यांना कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात आले आहे. ५ जणांना कंत्राटी स्वरूपात भरती करून त्यांना ११ महिन्याकरिता नियुक्त्या दिल्या आहेत.

शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली. २८०० शिक्षकांची पडताळणी पूर्ण झाली असून, त्यातील ५ शिक्षकांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले. त्यांना कंत्राटी भरती करून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

- कैलास दातखीळ

शिक्षणाधिकारी

जात वैधता सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या २१ मे २०२० च्या परिपत्रकानुसार यास मुदतवाढ दिल्याने या कर्मचाऱ्यांच्या सेवेत संरक्षण मिळाले आहे, असे प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संतोष राजगुरू यांनी सांगितले.

पुढे काय ?

अधिसंख्य पदावर नेमणूक दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिसंख्य पदावर चालू ठेवायच्या किंवा त्यानंतर करावयाच्या सेवाविषयक शिफारशी करिता समिती गठीत करण्यात आलेली आहे. हा अभ्यासगट अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आला आहे. या गटाच्या शिफारस शासनास प्राप्त होऊन त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.