नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:38 IST2018-03-20T00:38:21+5:302018-03-20T00:38:21+5:30
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची पाच लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष संशयित राजेश साहेबराव इंगळे यांच्या विरुद्ध देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची पाच लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष संशयित राजेश साहेबराव इंगळे यांच्या विरुद्ध देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देऊळगावमही येथील तरुण संतोष रामभाऊ जायभाये यास संशयित राजेश इंगळे याने बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये नोकरी लावून देतो म्हणून सांगितले. त्यासाठी टप्प्याटप्याने पाच लाख रुपये उकळले. संतोष जायभाये यांना बँक आॅफ महाराष्ट्रचे बनावट नियुक्तीपत्र दिले. मात्र, नोकरीसाठी बोलावणेच न आल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जायभाये यांनी पोलिसात धाव घेतली. उपनिरीक्षक मंजुषा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल केशव मुळे करीत आहेत.