पांगरी गोसावीत एकाच रात्री पाच घरे फोडली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 00:44 IST2019-12-02T00:44:27+5:302019-12-02T00:44:37+5:30

मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी एक दोन नव्हे पाच घरे फोडली.

Five houses broken in one night ... | पांगरी गोसावीत एकाच रात्री पाच घरे फोडली...

पांगरी गोसावीत एकाच रात्री पाच घरे फोडली...

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी एक दोन नव्हे पाच घरे फोडली. एका घरातील अर्ध्या लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
पांगरी गोसावी येथे शनिवारी रात्री गोविंद गंगाराम तोटे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील ५८ हजार रूपये किंमतीचे दागिने हातोहात लंपास केले. तसेच चोरट्यांनी इतर चार घराचे कडीकोंडे तोडून आतमध्ये प्रवेश केला.
मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. या प्रकरणी गोविंद तोटे यांच्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एकाच रात्रीत पाच घरात चोरट्यांनी प्रवेश केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांच्या मुस्क्या आवळाव्यात, अशी मागणी येथील नागरिकातून होत आहे.

Web Title: Five houses broken in one night ...