आरक्षणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:52+5:302021-02-13T04:29:52+5:30

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी साष्टपिंपळगाव (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ रविवारी १४ फेब्रुवारी ...

Fasting in front of every gram panchayat for reservation | आरक्षणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींसमोर उपोषण

आरक्षणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींसमोर उपोषण

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी साष्टपिंपळगाव (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ रविवारी १४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या समोर उपोषण केले जाणार आहे. या उपोषणात समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या न्याय्य मागणीसाठी साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास राज्यातून पाठिंबा मिळत असून, विविध मान्यवरांनीही आंदोलनाला भेटी देऊन आंदोलकांशी चर्चा केली आहे. समाजाच्या मागणीची धार अधिक तीव्र करण्यासाठी आता १४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. या उपोषणात समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेश राऊत, विष्णू पाचफुले, जगन्नाथ काकडे, संतोष गाजरे, अरविंद देशमुख, प्रशांत गाढे, सतीश देशमुख, ज्ञानेश्वर ढोबळे, जयंत भोसले, महेश निकम, अशोक पडूळ, संतोष कऱ्हाळे, विजय वाढेकर, रवींद्र जगदाळे, संदीप नाईकवाडे, करण जाधव, शुभम टेकाळे, सुभाष चव्हाण, पृथ्वीराज भुतेकर, प्रभाकर केदारे आदींनी केले आहे.

Web Title: Fasting in front of every gram panchayat for reservation