शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

फिनिश लाइनपर्यंत धावपटूंचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:24 IST

फनरनर्स ग्रुपच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस जालनेकरांसह अन्य शहरातूनही भरभरून सहभाग नोंदविला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : फनरनर्स ग्रुपच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस जालनेकरांसह अन्य शहरातूनही भरभरून सहभाग नोंदविला होता. जवळपास २४०० धावपटू यात सहभागी झाले होते. मात्र एवढी मोठी संख्या असतानाही सर्वकाही शिस्तीत सुरू होते. झुंबा नृत्याच्या तालावर प्रारंभी पहाटे पाच वाजेपासूनच मैदानावर उपस्थित धावपटूंचा वॉर्मअप सुरू होता. अनेकजण एकमेकांना धावण्यासाठी बेस्टलक देताना दिसून आले. सकाळी १२ सेल्सिअस तापमान असातनाही थंडीची तमा न बाळगता धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद वाखाण्या जोगा होता.रविवारी पहाटे पाच वाजेपासूनच संयोजक आणि धावपटूंची हजेरी बिज शितल सिडस्च्या मैदानावर होती. प्रत्येक धावपटूंना एकसारखे टी-शर्ट आणि पँट दिल्याने सर्व मैदान आकाशी रंगाने फुलून गेले होते. पहिला टप्पा २१ कि़मी. चा सुरू झाला होता. स्टार्टअप पॉइंटजवळ काऊंट - डाऊन सुरू झाल्यावर तर अंथरलेल्या इलेक्ट्रॉनिक चटईवर आपला पहिला पाय कधी पडतो आणि आपला टाईम आधी कसा नोंद होईल या उत्सुकतेत सर्वजण हातातील घडाळ्याकडे आणि संयोजकांच्या उलट गणतीकडे लक्ष ठेवून होता.मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेचा शुभारंभ झाला. ज्या प्रमाणे २१ कि़मी.मध्ये धावणाºयांचा उत्साह होता तोच उत्साह आणि तोच आनंद १० आणि ५ कि़मी. मध्ये सहभागी धावपटूंमध्ये होता.अनेकजण सेल्फी काढण्यातही मग्न होते, तर स्पर्धेत सहभागी आपल्या मित्राचे, नातेवाइकाचे व्हिडीओ आणि फोटो मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी देखील मिळेल त्या अँगलने तो क्षण टिपताना दिसून आले. फनरनर्सच्या संयोजकांनी स्पर्धा यशस्वीतेसाठीचा गृहपाठ उत्तमपणे सोडविल्याने कुठेच गोंधळ अथवा गडबड आढळून आली नाही. या स्पर्धेच्या नेटकेपणामुळे जालन्याचे नाव आता सन्माने या क्षेत्रात घेण्यात येत आहे.प्रारंभी स्पर्धेत सहभागी होऊन कमीत-कमी वेळेत अंतर कापण्यासाठी स्पर्धकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत दिसून आली. कोणीच कोणाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत नव्हते हे विशेष. रात्रीच्या अंधाराची गडद छाया सूर्याच्या उदयाने कधी कमी झाली ते स्पर्धकांना आणि संयोजकांसह उपस्थितांनाही कळले नाही.जेथपर्यंत ही स्पर्धा निश्चित केली होती. त्या दरम्यान स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी जागोजागी स्टॉल लावले होते. तसेच ढोलपथक , बँड तसेच उत्साह वाढविणा-या हिंदी गाण्यांमुळेही वातावरण प्रफुल्लीत झाले होते.या मॅरेथॉनमध्ये प्रत्येकजणच नंबर एकवर येईल हे तर शक्य नसते, परंतु यातील सहभागही तेवढाच महत्वाचा असून, आपली शारीरिक क्षमता आजमवण्याची ही एक संधीच असते अनेकांनी नमूद केले. धावून आल्यावर संयोजकांनी प्रत्येक सहभागी धावपटूला मेडल देऊन सन्मान केला. एकूणच १८ नोव्हेबरचा रविवार जालनेकरासाठी एक अविस्मरणीय न ठरल्यासच नवल.सहभाग : राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय खेळाडूजालना येथे रविवारी पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यापुढेही अशाच प्रकारे कुठेही मॅरेथॉन असल्या तरी आम्ही त्यात सहभागी होतो. याच वेळी पुढील महिन्यात १६ तारखेला लोकमतच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेतही आम्ही निश्चित सहभागी होवू असे सहभागी खेळाडूंनी सांगितले.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनSocialसामाजिक