अंमलबजावणी करा, अन्यथा रस्ते जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:49 IST2018-08-07T00:48:57+5:302018-08-07T00:49:20+5:30
आरक्षणासह धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर १२ आॅगस्टपर्यत अंमलबजावणी झाली नाही. तर राज्यातील महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा व तालुका महामार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेऊन रस्ता जाम करण्यासह १३ आॅगस्टला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने घेण्यात आला आहे.

अंमलबजावणी करा, अन्यथा रस्ते जाम
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आरक्षणासह धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर १२ आॅगस्टपर्यत अंमलबजावणी झाली नाही. तर राज्यातील महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा व तालुका महामार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेऊन रस्ता जाम करण्यासह १३ आॅगस्टला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने घेण्यात आला आहे.
धनगर आरक्षणासह विविध मागण्यासंदर्भात रविवारी रोजी शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शासनाला १२ आॅगस्टचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. याशिवाय धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती तात्काळ लागू करणे, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणे, मेंढ्यांना चराई क्षेत्र उपलब्ध करून देणे, शेळ्या-मेंढ्याची निर्यात करणे, धनगर समाजाच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय शेफर्ड कमिशन नेमण्यात यावे आदी धनगर समाजाच्या मागण्या प्रलंबित आहेत.
या संदर्भात नर्णय घेण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. बैठकीस जालना जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवांची उपस्थिती होती.