‘ब्रेक के बाद’ पुन्हा अतिक्रमण हटाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:14 AM2017-12-12T00:14:32+5:302017-12-12T00:14:45+5:30

नगर पालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा सुरू झाली.

Encroachment demolishing again | ‘ब्रेक के बाद’ पुन्हा अतिक्रमण हटाव

‘ब्रेक के बाद’ पुन्हा अतिक्रमण हटाव

googlenewsNext

जालना : नगर पालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा सुरू झाली. शहरातील सहा ठिकाणांवरील अतिक्रमणे दिवसभराच्या कारवाईत हटविण्यात आली. दरम्यान, मामा चौक परिसरातील अतिक्रमण हटविताना काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील रहदारीला अडथळा ठरणारी अनधिकृृत धार्मिक स्थळांची अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपालिकेने हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात पाच दिवस राबविलेल्या मोहिमेत शहरातील विविध भागांतील सुमारे साठ अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. दरम्यान, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांचा वार्षिक तपासणी दौरा असल्यामुळे मागील आठवड्यात अतिक्रमण हटाव मोहिमेस बंदोबस्त मिळू शकला नव्हता. सोमवारी सकाळी दुस-या टप्प्यात नळगल्ली भागातून धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. मंगळबाजार भागातील गौस पाक नशान, गुरूगणेश भवन परिसरातील सै. सादत दर्गा, कादराबाद परिसरातील गौस पाक वीरका निशान या धार्मिक स्थळांची अतिक्रमणे दुपारी दीड वाजेपर्यंत हटविण्यात आली. गरीबशहा बाजार परिसरातील दोन समाध्या तसेच मामा चौकातील हजरत सय्यद सादत दर्गा कारवाईमध्ये हटविण्यात आला.
मामा चौकात तणाव
मामा चौक परिसरातील अतिक्रमण काढत असताना, काही वेळ तणाव निर्माण झाला होता. नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. काही जणांनी या हे धार्मिक स्थळ अधिकृत असल्याची कागदपत्रे वकिलांच्यामार्फत सादर करण्याचा प्रयत्न केला. जमावातील एका युवकाने जेसीबी मशीनवर दगड मारल्यामुळे मशीनची काच फुटून नुकसान झाले. पोलिसांनी नागरिकांशी सकारात्मक चर्चा केल्यामुळे तणाव निवळला. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून शेख सलमान शेख शफीक (२१, रा.पेन्शनपुरा) या युवकावर स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Encroachment demolishing again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.