शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

स्तुत्य उपक्रम ! ‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ पुरस्काराने कोरोना योद्ध्यांचा होणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 18:53 IST

‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ पुरस्काराचे प्रत्येक आठवड्याला होणार वितरण

ठळक मुद्देजालना जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना

जालना : कोरोनाच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, स्वच्छता विभागातील अधिकारी, कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोरोनाच्या काळात उत्कृष्ठ काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना प्रत्येक आठवड्याला ‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ या पुरस्काराने गौरव करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेतला आहे. रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन या कोरोना योद्ध्यांचा गौरव केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी आयोजित विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आरोग्य विभागातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कोरोनाबाधितांवर उपचाराची मोठी जबाबदारी आहे. या काळात  डॉक्टर, नर्सेस, सेवक व सफाई कर्मचारी हे स्वत:ची, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत आहेत. अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ हा पुरस्कार वितरणाचा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक आठवड्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्टरांना चार हजार रूपये रोख व प्रशस्तीपत्र, परिचारिकेला तीन हजार रुपये, वॉर्डबॉयला दोन हजार रूपये व सफाई कर्मचाऱ्याला एक हजार रूपये रोख व व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, डॉ. जगताप आदींची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी स्वत: देणार रक्कमया पुरस्काराची रक्कम कोणत्याही शासकीय निधीतून दिली जाणार नाही. यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांसह इतरांनी इच्छेनुसार या बक्षिसाची रक्कम द्यायची आहे. पहिल्या आठवड्यातील पुरस्काराची रक्कम जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे स्वत: देणार आहेत. जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना