गाळामुळे तलावातील पाणीक्षमता घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:52 IST2019-04-17T00:52:32+5:302019-04-17T00:52:59+5:30
शहरालगत असलेल्या तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता घटली आहे. यामुळे तलावातील गाळ काढण्याची मागणी होत आहे.

गाळामुळे तलावातील पाणीक्षमता घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : शहरालगत असलेल्या तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता घटली आहे. यामुळे तलावातील गाळ काढण्याची मागणी होत आहे.
शहरालगत अंबा रस्त्यावर मोठा पुरातन तलाव आहे. या तालावात मच्छीमारीही असून पाणी साठवण क्षमता मोठी आहे. पावसाळ््यातील पाणी व गाव भागातील काही सांडपाणी या तलावात साठवले जाते. या तलावातील पाण्यामुळे आसपासच्या पाण्याचे स्त्रोत यांना बळकटी मिळते. पूर्वी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने हा तलाव सतत भरलेला राहायचा. या तलावामुळे जनावरांची तहान भागवली जाते. तसेच या तलावाच्या शेजारील वस्तीतील बोअरला बारा महिने पाणी राहते. आजही या तलावात बरेच पाणी आहे. मात्र, या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. मागील चार- पाच वर्षापूर्वी या तलावातील गाळ शासकीय यंत्रणेने काढला होता. हा गाळ सुपीक असल्याने शेतकऱ्यांनी वाहनाने शेतातही नेऊन टाकला होता. यामुळे आताही गाळ काढण्याची गरज आहे. यंदा पाऊस अल्पसा पडल्याने सध्य स्थितीत तालुक्यातील कोणत्याच तलावात पाणी नाही. मात्र या तलावात बरेच पाणी आहे. पण, या तलावातील गाळ काढल्यास आणखी पाणी साठवणूक क्षमता वाढणार असल्याचे बोलले जात आहे.