शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

आज जालन्यात तीन केंद्रांवर होणार ड्राय रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:26 IST

जालना : कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरेल, अशी लस दृष्टिपथात आलेली असतानाच आता लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ...

जालना : कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरेल, अशी लस दृष्टिपथात आलेली असतानाच आता लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी शनिवारी जिल्ह्यातील तीन केंद्रांवर ड्राय रन होणार असून, यासाठी ७५ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी दिली.

हे ड्राय रन जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, जिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव येथे होणार आहे. सकाळी ९ वाजेच्या सुमारास या ड्राय रनला सुरुवात होईल. त्यानुषंगाने शुक्रवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात डब्ल्यूएचओचे डॉ. मुजीब यांनी ड्राय रनमध्ये सहभागी असलेल्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. या ड्राय रनसाठी आरोग्य विभागातील ७५ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या ७५ जणांना तासभराअगोदरच मोबाइल मॅसेज येईल. त्यानंतरच त्यांना लसीकरणासाठी येता येईल. प्रत्येक केंद्रावर डॉक्टरांसह ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस यांचा समावेश आहे. लसीकरणासाठी तीन रूम तयार करण्यात आल्या आहेत. हा ड्राय रन बारा वाजेपर्यंत चालणार असल्याचेही डॉ. खतगावकर यांनी सांगितले.

अशी दिली जाणार लस

लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीस मोबाइलवर मेसेज येईल. त्यानंतर पोलीस कर्मचारी संबंधित व्यक्तीचा मोबाइलवर आलेला मेसेज पाहूनच त्याला केंद्रात सोडतील. पहिल्या रूममध्ये कागदपत्रांची तपासणी केली जाईल. दुसऱ्या रूममध्ये लसीकरण करण्यात येईल. तिसऱ्या रूममध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तीस अर्धा तास निगराणीत ठेवले जाईल. त्यानंतर शिक्षक कोविन अ‍ॅपवर संबंधित व्यक्तीची माहिती भरणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

यांच्यावर राहील जबाबदारी

डॉक्टर, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस यांच्यावर लसीकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना तसे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.