प्रसंगावधान राखल्याने वाचला चालकाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:32 IST2019-01-24T00:31:39+5:302019-01-24T00:32:08+5:30

भोकरदन तालुक्यातील कोठा कोळी येथील कौतिक गोरे यांच्या शेतामध्ये नांगरणी करत असताना ट्रॅक्टर बाजूला असलेल्या विहिरीत कोसळले. परंतु चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ उडी मारल्याने जीव वाचला

The driver's survival from accident | प्रसंगावधान राखल्याने वाचला चालकाचा जीव

प्रसंगावधान राखल्याने वाचला चालकाचा जीव

लोकमत न्यूज नेटवर्क
हिसोडा : भोकरदन तालुक्यातील कोठा कोळी येथील कौतिक गोरे यांच्या शेतामध्ये नांगरणी करत असताना ट्रॅक्टर बाजूला असलेल्या विहिरीत कोसळले. परंतु चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ उडी मारल्याने जीव वाचला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
कोठा कोळी येथील शेतकरी कौतिक गोरे यांच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणीचे काम सुरू होते. २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नांगरणी करताना ट्रॅक्टर पलटून आणताना जवळच असलेल्या विहिरीच्या कठड्याला नांगराचा फाळ लागला.
यामुळे चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून सुमारे ७० फुट विहिरीत ट्रॅक्टर कोसळत असताना चालकाना प्रसंगावधान राखून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती गावात समजताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॅक्टर विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

Web Title: The driver's survival from accident