भोकरदनजवळ रस्त्यावरील पाईपला दुचाकी धडकल्याने चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 19:42 IST2019-01-22T19:40:43+5:302019-01-22T19:42:40+5:30
ही घटना सोमवारी रात्री भोकरदन-जाफराबाद मार्गावरील बाभूळगाव फाटा येथे घडली.

भोकरदनजवळ रस्त्यावरील पाईपला दुचाकी धडकल्याने चालक ठार
दानापूर (जालना ) : रस्त्यावरील पाईपला दुचाकी धडकून झालेल्या एका अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री भोकरदन-जाफराबाद मार्गावरील बाभूळगाव फाटा येथे घडली. विष्णू भानूदास डहाळे (३२,रा. बरंजळा साबळे असे दुचाकीस्वाराचे नावे आहे.
विष्णू डहाळे हे दुचाकीवर (क्रमांक एम. एच. २८ एल ०८९७ ) भोकरदन येथून बरंजळा साबळे येथे सोमवारी रात्री जात होते. परिसरात नळकांडी पुलाचे काम सुरु असल्याने रस्ता खोदलेला आहे. अंधारामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने डहाळे यांची दुचाकी पुलाच्या कामासाठी आणलेल्या पाईपला जोरात धडकली. यात रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. भोकरदन पोलिसांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक साकले, हेडकॉन्सटेबल गायकवाड, पायघन उपस्थित होते. या मार्गावर नियमित अपघात होत असल्याने वळण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.