ट्रॅक्टर अपघातात चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:22 IST2020-02-06T01:22:01+5:302020-02-06T01:22:14+5:30

उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला.

Driver killed in tractor accident | ट्रॅक्टर अपघातात चालकाचा मृत्यू

ट्रॅक्टर अपघातात चालकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदी : उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी गोंदी- हसनापूर मार्गावर घडली.
प्रदीप रामचंद्र नाहिराळे (३२ रा. दिशानागरी समर्थ कारखाना) असे मयताचे नाव आहे. अंबड तालुक्यातील साडेगाव शिवारातून उसाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन चालक प्रदीप नाहिराळे हे बुधवारी सकाळी समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर कडे जात होते. हसनापूर फाट्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने तो खाली पडला आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी ही माहिती गोंदी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पगारे, दिलीप दिवटे यांनी भेट दिली. तसेच कारखान्याचे सुरक्षा कर्मचारी एफ. एम. दुनगे, आर. एम. मोरे, एन. एस. खोजे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Driver killed in tractor accident