चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 10:38 IST2025-06-01T10:34:33+5:302025-06-01T10:38:39+5:30

ही घटना  रविवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास धुळे सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव शिवारात घडली. 

Driver fell asleep, car crossed the divider and hit the track; one died, incident on Dhule-Solapur highway | चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना

चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना


पवन पवार -

वडीगोद्री - भरधाव वेगाने शिर्डीकडे जाणाऱ्या इरटीगा कारचालकाला डुलकी लागल्याने कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन ट्रकला धडकली. या अपघातात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना  रविवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास धुळे सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव शिवारात घडली. 

या अपघातात पी रमेश पी कृष्णा मूर्ती वय ४५ रा. मदनपेठ, मलकपेठ हैद्राबाद असे अपघातातील मृताचे नाव असून श्रीराम दहीता वय २५ रा. हैदराबाद हा जखमी झाला आहे. या अपघातात कार चक्काचूर झाली आहे.

इरटीगा कार क्रमांक एपी ११ एटी ०४५५ हैद्राबादहून शिर्डी कडे भरधाव वेगाने जात असताना कार चालक याला डूकली लागली अन् नियंत्रण सुटले अन् कार थेट दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बीड कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे ३२ जीई ०२९१ ला जाऊन धडकली हा अपघात एवढा भिषण होता की कार चा चक्का चूर झाला असून  एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी महामार्ग १०३३ रुग्णवाहिका व मदतनीस यांनी येऊन पर प्रांतीयास दरवाजा टांबी व लोखंडी पहार ने तोडून बाहेर काढले व वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मयताचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला.

अपघात झाल्यानंतर धुळे सोलापूर महामार्गावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. गोंदी पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत करून वाहने बाजूला केली. या महामार्गावर अपघाताचे सत्र चालूच आहे.

Web Title: Driver fell asleep, car crossed the divider and hit the track; one died, incident on Dhule-Solapur highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.