District-level patriotic singing competition organized by Lokmat on Friday | लोकमततर्फे शुक्रवारी जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा
लोकमततर्फे शुक्रवारी जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकमत आणि स्टील असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या समुहाला यामध्ये सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. स्पर्धेतील उत्कृष्ठ संघास प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह, व्दितीय पारितोषिक ३ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह तर तृतीय पारितोषिक २ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह असे राहणार असून उत्तेजनार्थ समुहास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ शाळांनी नावनोदंणीसाठी (मो. ९७६६८७६६९६) यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना २३ जानेवारीच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जगली पाहिजे या उदात्त हेतूने या स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: District-level patriotic singing competition organized by Lokmat on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.