भाजपच्या वतीने जालना जिल्हाभरात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:30 IST2020-02-25T23:30:32+5:302020-02-25T23:30:45+5:30
महाआघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या वतीने जालना जिल्हाभरात धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाआघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शासनविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजूळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरर्गे, शहराध्यक्ष राजेश राऊत, सिध्दीविनायक मुळे, संदीप जाधव, परसराम वनिकर, चव्हाण, शशिकांत घुगे आदींची उपस्थिती होती.
बदनापूरमध्ये घोषणाबाजी
बदनापूर : येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात तालुकाध्यक्ष भीमराव भुजंग, बद्रीनाथ पठाडे, वसंत जगताप, पद्माकर जºहाड, हरिश्चंद्र शिंदे आदींची उपस्थिती होती.
घनसावंगीत धरणे
तीर्थपुरी : घनसावंगी तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात माजी आमदार विलास खरात, तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी देवनाथ जाधव आदी उपस्थित होते.
परतूर येथे आंदोलन
परतूर : येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहूल लोणीकर, भगवान मोरे, रमेश भापकर, रामप्रसाद थोरात, विलास आकात शत्रुघ्न कणसे आदींची उपस्थिती होती.
जाफराबाद तहसील
जाफराबाद : येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, जिल्हा परिषद सदस्य शालीकराम म्हस्के, माजी अध्यक्ष गोविंदराव पंडित, संतोष लोखंडे उपस्थित होते.
अंबडमध्ये आंदोलन
अंबड : येथे करण्यात आलेल्या आंदोलनात दीपकसिंह ठाकूर, राजेंद्र ठोसर, संदीप खरात, जितेंद्र पालकर, सौरभ कुलकर्णी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भोकरदन : तहसील परिसर दणाणला
भोकरदन : महाआघाडी शासनाच्या धोरणांविरोधात भाजपच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता.
मागण्यांचे निवेदन तहसीलदार संतोष गोरड यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख, जि. प. सदस्या आशा पांडे, पं. स. सभापती विनोद गावंडे, जि. प. सदस्य चंद्रकांत साबळे, जि. प. सदस्य तुकाराम जाधव, जि. प. सदस्या सुनीता सपकाळ, जि. प. सदस्य अजिंक्य वाघ आदींची उपस्थिती होती.