कार-दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत उपसरपंचाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 17:27 IST2022-08-17T17:27:37+5:302022-08-17T17:27:56+5:30
ग्रामस्थांनी जालन्यातील रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान झाला मृत्यू.

कार-दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत उपसरपंचाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
राजूर( जालना): कार आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना राजूर ते चणेगांव रस्त्यावर मंगळवारी सांयकाळी घडली. दौलत सोनाजी निहाळ(60) असे मृताचे नाव असून ते बदनापूर तालुक्यातील चणेगांव येथील उपसरपंच आहेत.
याविषयी माहीती अशी की, उपसरपंच दौलतराव निहाळ हे शेत काम आटोपून दुचाकीवरून गावात येत होते. तर राजूरहून दाभाडीकडे एक कार जात होती. दरम्यान, राजूर ते चणेगांव रोडवर निहाळ यांच्या दुचाकीची आणि कारची समोरसमोर धडक झाली. यात निहाळ आणि दुचाकीवरील बाबासाहेब पवार गंभीर जखमी झाले.
ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी जालन्यातील रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी संध्याकाळी निहाळ यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार न थांबवता चालकाने तेथून पोबारा केला. निहाळ यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.