जालन्यात धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 18:13 IST2018-11-22T18:11:28+5:302018-11-22T18:13:27+5:30
जालना एमआयडीसी जवळ धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

जालन्यात धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू
जालना : जालन्याहुन रेल्वेने औरंगाबादला जातांना जालना एमआयडीसी जवळ धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. शंकर केशव भुजबळ (६४, रा. शेवगाव, जि. अहमदनगर) असे मयत वृध्दाचे नाव आहे.
शंकर भुजबळ हे जालन्याहुन औरंगाबादला रेल्वेने जात होते. रेल्वेत गर्दी असल्याने ते दरवाज्यात बसले होते. जालना औद्योगिक वसाहती जवळ त्यांचा अचानक तोल गेल्याने ते खाली पडले. यावेळी अंगावरुन रेल्वे जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, रेल्वेत नोकरी करणारे अश्रुबा नागोबा गिते (रा. सरस्वती जालना) हे दरेगाव ते सेलगाव दरम्यान पटरीची तपासणी करीत होते. तेव्हा त्यांनी मृतदेह दिसला. त्यांच्या फिर्यादीवरुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.