मातीच्या ढिगाऱ्याखाली मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:44 IST2019-03-29T00:43:55+5:302019-03-29T00:44:16+5:30
विटा तयार करण्यासाठी नदी पात्रातील माती कोरताना दरड कोसळून मजुराचा मृत्यू झाला.

मातीच्या ढिगाऱ्याखाली मजुराचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : विटा तयार करण्यासाठी नदी पात्रातील माती कोरताना दरड कोसळून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी कुरण (ता. अंबड) येथील गोदापात्रात घडली.
काशीनाथ लक्ष्मण तिळे (रा. ढोंडराई ता. गेवराई) यांच्या कुरण येथील वीट भट्टीवरील कामगार राजू हरी केसरे (वय- ३६, रा. गंधारी गायरान, ता. अंबड) बुधवारी सायंकाळी विटा बनविण्यासाठी कुरण (ता. अंबड) येथील गोदापात्रात माती कोरत होते. दरम्यान, दरडीचा वरचा भाग अचानक कोसळला. यात त्यांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. केसरे यांच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.