कोदा येथे अज्ञात तापाने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:34 IST2018-12-10T00:34:30+5:302018-12-10T00:34:53+5:30

भोकरदन तालुक्यातील कोदा येथील सचिन दिलीप पाडळे (२१) या युवकाचा ७ डिसेंबर रोजी अज्ञात तापाने मृत्यू झाला.

Death due to unknown fever in Koda | कोदा येथे अज्ञात तापाने युवकाचा मृत्यू

कोदा येथे अज्ञात तापाने युवकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
आन्वा : भोकरदन तालुक्यातील कोदा येथील सचिन दिलीप पाडळे (२१) या युवकाचा ७ डिसेंबर रोजी अज्ञात तापाने मृत्यू झाला.
आन्वा व कोदा परिसरात वातावरणाच्या बदलामुळे विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप या आजारांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायत गावातील नाल्या सफाई व दुर्गंधीकडे लक्ष देत नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढत चालले आहे.
अज्ञात तापाने युवकाचा मृत्यू झाल्यामुळे प्रा.आ.केंद्र आन्वाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली कोदा येथे सर्वेक्षण केले. आरोग्य कर्मचारी धारे, पी.एम पायघन, आशाताई सरला बारी, सुनीता लहासे, सविता जाधव आदींनी कोदा गावाचा सर्व्हे करून तपासणी केली.

Web Title: Death due to unknown fever in Koda