शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार पिंपळगावात दासबोध चक्री पारायणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:50 IST

जांब समर्थ येथे चैतन्य ज्ञानपीठ अंतर्गत समर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु: शताब्दी प्रबोधन समितीच्या वतीने चातुमार्सानिमित्त घेण्यात आलेल्या दासबोध चक्री परायणाची सांगता मंगळवारी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे चैतन्य ज्ञानपीठ अंतर्गत समर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु: शताब्दी प्रबोधन समितीच्या वतीने चातुमार्सानिमित्त घेण्यात आलेल्या दासबोध चक्री परायणाची सांगता मंगळवारी झाली.यावेळी अध्यक्षस्थानी चैतन्य ज्ञानपीठाचे अध्यक्ष डॉ.जगदीश करमळकर हे होते तर महाव्यवस्थापक महेशचंद्र कवठेकर, हभप पांडुरंग महाराज आनंदे , बाळासाहेब नाईक , समर्थ मंदिराचे विश्वस्त महेश साकळगावकर, मुकुंद गोरे, सूर्यकांत कुलकर्णी, विनायक देशपांडे, रवींद्र भामरे, दिलीप कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती , कार्यक्रमाची सुरुवात समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलनाने करण्यात आली, यावेळी दिलीपराव कस्तुरे व जगदीश करमळकर यांनी विचार मांडले, दरम्यान विश्वहिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब नाईक यांचा चैतन्य ज्ञानपीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला व स्वर्गीय समर्थ भक्त सुनील चिंचोलकर व सुहास आगरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काही पारायणकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोधन समितीचे अध्यक्ष विनायक देहेडकर यांनी केले, सूत्र संचालन सुरेशराव पाटोदकर यांनी केले तर सुहास बीडकर यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला सुरेश नांदेडकर, अशोक शेलगावकर , प्रकाशराव तांगडे, बाबासाहेब तांगडे, माजी सरपंच विलास तांगडे, विनायक दसरे, गुलाबराव तांगडे, रामकीसन मोगरे , यांच्यासह दोन ते अडीच हजार समर्थ भक्तांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावकऱ्यांची मोठी साथ मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरवर्षी हा उपक्रम हाती घेण्यात येतो.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक