कॅन्सर जनजागृतीसाठी जवानाची सायकलयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:45 IST2018-12-03T00:45:04+5:302018-12-03T00:45:40+5:30
कॅन्सर या असाध्य रोगाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी माहोरा (ता. जाफराबाद ) येथील जवान गजानन काळे यांच्या ब-हाणपूर ते पुणे या १ हजार ४८१ किलोमीटरच्या सायकल रॅलीला रविवारी सुरुवात करण्यात आली.

कॅन्सर जनजागृतीसाठी जवानाची सायकलयात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कॅन्सर या असाध्य रोगाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी माहोरा (ता. जाफराबाद ) येथील जवान गजानन काळे यांच्या ब-हाणपूर ते पुणे या १ हजार ४८१ किलोमीटरच्या सायकल रॅलीला रविवारी सिने अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आल्याची माहिती डॉ. काळे परिवाराच्यावतीने देण्यात आली.
यावेळी मेजर जनरल पी. एस. भाटिया, डॉ. स्नेहा यांची प्रमुख उपस्थिती होती. कॅन्सरवर हिंमतीने मात करणारे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्तिथीत या रॅलीचा समारोप होणार आहे. गजानन काळे हे भारतीय सैन्य दलात लुधियाना येथे एअर डिफेन्समध्ये हवालदार या पदावर कार्यरत आहेत. ३० नोव्हेंबर रोजी ते सेवेची १६ वर्ष पूर्ण करून सेवेतून निवृत्त झाले आहेत. कलाबाई काळे कॅन्सर फाऊंडेशनच्या माध्यमातून ते कॅन्सर विषयी विविध उपक्रमातून जनजागृती करतात.
२३ दिवसांच्या या अंतरात काळे ५ राज्ये आणि त्यातील १३ जिल्ह्यातून प्रवास करणार आहेत. २३ गावे आणि शहरात त्यांचा मुक्काम असणार आहे.या दरम्यान विविध सायकलिंग क्लब त्यांना सहकार्य करणार आहे.