coronavirus : धक्कादायक ! अँटिजन चाचणीत निगेटिव्ह अन् स्वॅब नमून्यात पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 04:23 PM2020-07-27T16:23:17+5:302020-07-27T16:24:51+5:30

पॉझिटिव्ह आलेल्या चौघांना सोमवारी कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले.

coronavirus : Shocking! Negative in antigen test and positive in swab sample | coronavirus : धक्कादायक ! अँटिजन चाचणीत निगेटिव्ह अन् स्वॅब नमून्यात पॉझिटिव्ह

coronavirus : धक्कादायक ! अँटिजन चाचणीत निगेटिव्ह अन् स्वॅब नमून्यात पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देडिस्चार्ज दिलेल्या चौघांचा अहवाल पॉझिटिव्हबाधिताच्या संपर्कातील १० जणांची चाचणी करण्यात आली

केदारखेडा  : कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या केदारखेडा येथील १० जणांची अ‍ॅटिजन चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर सर्वांना डिर्स्चाज देण्यात आला. परंतु, प्रयोगशाळेकडून यातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. 

केदारखेडा येथे गेल्या आठवड्यात ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेच्या संपर्कातील दहा जणांना भोकरदन येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. मंगळवारी त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. पंरतु, पाच दिवस उलटूनही चाचणीचे नमूने प्राप्त होत नसल्याने रविवारी कोविड सेंटरच्या डॉक्टरांनी दहा जणांची अ‍ॅटिजन चाचणी केली. यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर सर्वांना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना डिस्चार्ज देऊन तीन तास होत नाही तोपर्यत या दहापैकी चार जणांचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाला. यामुळे गावात खळबळ उडाली. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या चौघांना सोमवारी कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्याशी दुरध्वनीवरुन  संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही. 

डिस्चार्जनंतर चार जण बाधित आढळले
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सूचनेवरुन या दहा जणांची अँटिजन चाचणी तात्काळ करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांचा  स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 
- डॉ. दयानंद मोतीपवळे, वैद्यकीय अधीक्षक, भोकरदन 

Web Title: coronavirus : Shocking! Negative in antigen test and positive in swab sample

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.