CoronaVirus : जालन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण; सौदीवरून परतलेली महिला पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:37 IST2020-04-06T12:37:52+5:302020-04-06T12:37:58+5:30
६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus : जालन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण; सौदीवरून परतलेली महिला पॉझिटीव्ह
जालना : जालना शहरातील दु:खीनगर भागातील एका ६५ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सदरील महिला सौदी अरेबिया येथून जालना येथे आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. जालना जिल्ह्यातील हा पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे.
सोमवारी सकाळपर्यंत २०४ जणांना कोरोना संशयित म्हणून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पैकी १४० जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. दरम्यान, शहागड (ता.अंबड) येथील ४६ संशयितांना रविवारी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर शहागड येथीलच आणखी आठ जणांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या स्वॅबचा अहवाल सोमवारी दुपारपर्यंत प्रशासनाकडे प्राप्त झाला नव्हता.