शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तीन केंद्रांवर रंगीत तालीम यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST

जालना : कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरेल, अशी लस दृष्टिपथात आलेली असतानाच आता लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ...

जालना : कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरेल, अशी लस दृष्टिपथात आलेली असतानाच आता लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी शनिवारी जिल्ह्यातील तीन केंद्रांवर ड्राय रन घेण्यात आला. यात ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

हे ड्राय रन जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, जिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव येथे पार पडले. सकाळी ९ वाजेच्या सुमारास या ड्राय रनला सुरुवात झाली. जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्राला फुगे व आकर्षक रांगोळींनी सजविण्यात आले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण केंद्राला भेट दिली. त्यानंतर लसीकरणाचे प्रात्यक्षिक सुरू करण्यात आले. जवळपास २५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता. सुरुवातीला सर्व लाभार्थ्यांच्या मोबाइलवर मेसेज पाठविण्यात आले. ज्या व्यक्तीला मेसेज आला, त्याच व्यक्तीला केंद्रात सोडण्यात आले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या मोबाइलवर मेसेज पाहून त्याला आत सोडले. पहिल्या रूममध्ये कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दुसऱ्या रूममध्ये लसीकरण केले गेले. यावेळीच आरोग्य सेविकाने संबंधित व्यक्तीला चार संदेशही दिले. तिसऱ्या रूममध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तीला अर्धा तास निगराणीत ठेवण्यात आले. त्यानंतर शिक्षकांनी कोविन अ‍ॅपवर संबंधित व्यक्तींची माहिती भरून घेतली. प्रत्येक केंद्रावर ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यावेळी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक अर्चना भोसले, डब्ल्यूएचओचे डॉ. मुजीब यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

लसीकरण केंद्राची सजावट

जिल्हा शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्राची प्रशासनाने सजावट केली होती. यावेळी ठिकठिकाणी फुगे लावण्यात आले होते. केंद्रात आकर्षक रांगोळी काढण्यात आली. या रांगोळींमध्ये कोविड व्हॅक्सिनचे चित्र काढण्यात आले होते. या रांगोळींनी सर्वांनाच आकर्षित केले. ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन केले गेले.

यांनी बजावली सेवा

आरोग्यसेविका आर. डी. वसू यांच्याकडे लसीकरणाची जबाबदारी देण्यात आली होती, तसेच लसीकरण झाल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीला चार संदेशही दिले. आशा कार्यकर्ती ज्योती कुलकर्णी, अंगणवाडी सेविका वंदना केदारे, अरुणा चव्हाण, पोलीस कर्मचारी संदीप पवार, परमेश्वर पथरे यांनी केंद्रावर सेवा बजावली.

या कर्मचाऱ्यांचा सहभाग

कुमारसनी गुडेकर, महेश गायकवाड, नितीन गालपाडे, लक्ष्मी पाईकराव, श्रद्धाराणी पंडित, अनुजा दाणी, मनोज जाधव, प्रियंका निथुरकर, किरण वासू, पंकज शिंदे, साधना वारे, सतीश बोरडे, सोनाजी भुतेकर, मंगल राऊत, बाबासाहेब वाघ, तेजस्वीनी वाघमारे, प्रदीप बोरसे, राजेंद्र अंभोरे, कविता वाघमारे आदींनी सहभाग घेतला होता.

हा दिला जाणार संदेश

तुम्हाला कोरोनाची लस दिली जाणार आहे, त्या लसीपासून तुमचे संरक्षण होणार आहे.

तुम्हाला काही त्रास झाला तर तुम्ही शेजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन दाखवू शकता.

पुढची लस कधी आणि किती वाजता दिली जाणार याचा मेसेज तुम्हाला केला जाईल.

ही लस दिल्यानंतरही मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करावा.