शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूशी गाठ! पेटत्या हायवामधून चालक-मजुराची उडी; वडीगोद्री-जालना महामार्गावर थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:23 IST

वडीगोद्रीजवळ धावत्या ट्रकने घेतला पेट; चालक आणि मजुराच्या समयसूचकतेने टळली मोठी जीवितहानी

- पवन पवार वडीगोद्री (जि. जालना): शहागड येथून जालन्याकडे विटा घेऊन जाणाऱ्या एका हायवा ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. वडीगोद्री-जालना मार्गावरील डाव्या कालव्याजवळ ही घटना घडली असून, आगीने रौद्र रूप धारण केल्याने ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने, हायवा चालक आणि सोबत असलेल्या मजुराने पेटत्या ट्रकमधून वेळीच उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला.

नेमकी घटना काय? शहागड येथील वीट उत्पादक ऋषीकेश वसंत सापटे यांचा हायवा (क्र. MH 12 PQ 9016) विटा घेऊन जालन्याकडे निघाला होता. वडीगोद्री कालव्याजवळ पोहोचल्यावर ट्रकच्या समोरील भागातून अचानक धूर निघू लागला आणि क्षणात आगीचे लोळ उठले. हे बघताच चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक लावला आणि मजुरासह तात्काळ बाहेर उडी मारली. महामार्गावर आग विझवण्यासाठी कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने आगीने संपूर्ण ट्रक कचाट्यात घेतला.

लाखोंचे नुकसान, वाहतूक विस्कळीत या भीषण आगीत ट्रकचे इंजिन आणि केबिन पूर्णपणे जळून खाक झाले असून मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीच्या लोळामुळे आणि धुरामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शॉर्ट सर्किट किंवा इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Close Call: Driver, Laborer Jump from Burning Truck on Highway

Web Summary : A truck carrying bricks caught fire near Wadigodri, Jalna. The driver and a laborer escaped unharmed by jumping from the vehicle. The fire completely destroyed the truck, causing significant financial loss and temporarily disrupting traffic. The cause is suspected to be a short circuit or engine malfunction.
टॅग्स :AccidentअपघातJalanaजालनाhighwayमहामार्ग