पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:43 IST2018-09-23T00:42:49+5:302018-09-23T00:43:30+5:30
भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करणारे जुई धरण कोरडेठाक झाल्याने शहरासह परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करणारे जुई धरण कोरडेठाक झाल्याने शहरासह परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असताना प्रशासन कुठल्याही हालचाली करीत नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.
तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जुई धरणात पाणी आले नाही. शिवाय शेलूद येथील धामणा धरण सुध्दा कोरडेठाक आहे. त्यामुळे या धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या भोकरदन शहरासह २५ गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या या गावांना पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, सप्टेंबरमध्येच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हाधिका-यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी धरणाला भेट देऊन पाहणी केली होती. परंतु, अद्यापही प्रशासनाने काहीच पावले उचलेली नाही.
दरम्यान, यावर्षी पावसाळा संपत आला आहे. मात्र, अद्यापही तालुक्यात जोरदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिके संकटात सापडली आहेत.