वडीगोद्री उड्डाणपुलावर धावत्या कारने घेतला पेट; चार प्रवाशांनी वेळीच उड्या घेतल्याने अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:05 IST2026-02-20T16:01:19+5:302026-02-20T16:05:25+5:30

बीडहून छत्रपती संभाजीनगरला जात असताना कारने अचानक पेट घेतला; काही सेकंद उशीर झाला असता तर...

Car Catches Fire on Wadigodri Flyover in Jalna; 4 Passengers Escape Safely | वडीगोद्री उड्डाणपुलावर धावत्या कारने घेतला पेट; चार प्रवाशांनी वेळीच उड्या घेतल्याने अनर्थ टळला

वडीगोद्री उड्डाणपुलावर धावत्या कारने घेतला पेट; चार प्रवाशांनी वेळीच उड्या घेतल्याने अनर्थ टळला

वडीगोद्री (जालना): धुळे-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी दुपारी एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची खळबळजनक घटना घडली. वडीगोद्री टी-पॉईंटवरील उड्डाणपुलावर ही आग लागली. सुदैवाने, कारच्या एसीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली आणि चारही प्रवासी तातडीने खाली उतरले. प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील एक कुटुंब आपल्या मित्राची कार (MH-11-DD-6081) घेऊन नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांची कार वडीगोद्री उड्डाणपुलावर आली असता, अचानक एसीच्या व्हेंट्समधून धूर निघू लागला.

अग्निशमन दलाची उणीव भासली
धूर दिसताच प्रवाशांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडीतून बाहेर उड्या घेतल्या. ते बाहेर येताच कारने भीषण पेट घेतला. महामार्गावर वडीगोद्री परिसरात अग्निशमन दलाची सुविधा नसल्याने आग विझवण्यासाठी ग्रामस्थांना मर्यादा आल्या. कार पूर्णपणे जळेपर्यंत आग आटोक्यात येऊ शकली नाही. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

Web Title : जालना के पास फ्लाईओवर पर कार में आग; यात्री सुरक्षित निकले

Web Summary : जालना के पास एक फ्लाईओवर पर एक कार में आग लग गई। धुंआ देखने के बाद यात्री सुरक्षित निकल गए, लेकिन कार पूरी तरह से जल गई। घटना से यातायात बाधित हो गया।

Web Title : Car Catches Fire on Flyover; Passengers Escape Unhurt Near Jalna

Web Summary : A car caught fire on a flyover near Jalna. Passengers escaped unharmed after noticing smoke, but the car was completely destroyed. The incident caused traffic disruption.