Burglaries loot case worth Rs 2 lakh with gold and silver jewelry in Jalana | घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाखांचा मुद्देमाल लंपास

घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाखांचा मुद्देमाल लंपास

ठळक मुद्देघरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरंट्यांनी घराचे कुलुप तोडून केली चोरी

जालना : घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरंट्यांनी घराचे कुलुप तोडून सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना जुना जालना भागातील नुतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सोमवारी रात्री घडली. यात सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा २ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. 

नुतन वसाहत येथील रहिवाशी एकनाथ गणपत पाटेकर (६५) हे सोमवारी दुपारी परिवारासह कडेगाव येथे नातवाच्या वाढदिवसासाठी गेले होते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे सोनटक्के  यांनी फोन करून सांगितले की, घराचे दोन्ही दरवाज्याचे कुलुप कोणीतरी तोडलेले आहे.  अशी माहिती मिळताच ते परिवारासह घरी आले. गेटचे कुलुप तोडून दरवाज्याचे कुलुप चोरंट्यांनी तोडले होते. घरात जाऊन पाहिले असता, कपाटाचे दार उघडून सुटकेसमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५५ हजार रूपये चोरंट्यांनी चोरून नेले.

Web Title: Burglaries loot case worth Rs 2 lakh with gold and silver jewelry in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.