‘त्या’ युवकावर गावठी पिस्तुलाने झाडली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:34 IST2019-09-02T00:34:37+5:302019-09-02T00:34:55+5:30

मैदानात खून झालेल्या ‘त्या’ युवकाच्या डोक्यात गावठी पिस्तूलने गोळी झाडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

A 'bullet pistol shot' at that young man | ‘त्या’ युवकावर गावठी पिस्तुलाने झाडली गोळी

‘त्या’ युवकावर गावठी पिस्तुलाने झाडली गोळी

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : शहराजवळील मैदानात खून झालेल्या ‘त्या’ युवकाच्या डोक्यात गावठी पिस्तूलने गोळी झाडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशीही परतूर येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
परतूर शहराबाहेरील एका मैदानावर शनिवारी दुपारी कुंदन खंडेलवाल (२०) या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
त्या युवकाच्या डोक्यात गावठी पिस्टलने गोळी झाडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेच्या दुसºया दिवशीही दुपारपर्यंत शहरातील बाजारपेठ बंद होती. सकाळी शासकीय रूग्णालयात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
यावेळी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, उपविभागीय पोलिस अधीकारी सोपान बांगर, पोनि सुभाष भुजंग यांनी रूग्णालयात येवून मयताच्या नातेवाईकांची समजूत घातली. तसेच पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करू, असे अश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: A 'bullet pistol shot' at that young man