बुलढाणा अर्बन बँक दरोडा: दोन दरोडेखोर पकडण्यात यश, ३ कोटींचे दागिने,२४ लाख रुपये हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 10:00 AM2021-10-30T10:00:00+5:302021-10-30T10:01:36+5:30

दरोड्यातील आरोपींचा माग काढत पाच पथके विविध भागात रवाना झाले होते.

Buldhana Urban Bank robbery: Two robbers nabbed, jewelery worth Rs 3 crore, Rs 24 lakh seized | बुलढाणा अर्बन बँक दरोडा: दोन दरोडेखोर पकडण्यात यश, ३ कोटींचे दागिने,२४ लाख रुपये हस्तगत

बुलढाणा अर्बन बँक दरोडा: दोन दरोडेखोर पकडण्यात यश, ३ कोटींचे दागिने,२४ लाख रुपये हस्तगत

googlenewsNext

- सय्यद इरफान

शहागड (ता.अंबड) : बुलढाणा अर्बन बँक दरोड्याप्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळले असून गेवराई येथून दोघांना शनिवारी पहाटे ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व गोंदी पोलिसांनी गेवराई शहरातील संजय नगर येथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येथील बुलढाणा अर्बन बँकेतून तीन दरोडेखोरांनी फिल्मीस्टाईलने धुडगूस घालत बंदुकीच्या नोकेवर रोख रक्कम व लाॅकर मधून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी दिवसाढवळ्या घडली होती. मोठा दरोडा असल्याने घटनास्थळी पाहणी करण्यासाठी स्वतः पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी दरोडा स्थळाची पाहणी केली. त्यामुळे या तपासला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या प्रकरणात पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे सुभाष भुजंग यांनी लक्ष घातले होते.

दरम्यान, दरोड्यातील आरोपींचा माग काढत पाच पथके विविध भागात रवाना झाले होते. अशातच स्थानिक गुन्हे शाखा व गोंदी पोलिसांना दरोड्यातील आरोपी हे संजय नगर गेवराई जि.बीड येथील असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींनाकडून दरोड्यातील ३ कोटी ६० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व २४ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. 

आरोपींना पकडण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे सुभाष भुजंग यांनी तर पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, दुर्गेश राजपूत, बोंडले, पोलिस काॅन्सटेबल संजय मगरे, सॅम्युएल कांबळे, प्रशांत देशमुख, गोकुळ कायटे, रंनजित वैराळ, जगदीश बावणे, जैवळ, प्रकाश लोखंडे, भागवत खरात, उपनिरीक्षक गजानन कौळासे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Buldhana Urban Bank robbery: Two robbers nabbed, jewelery worth Rs 3 crore, Rs 24 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.