शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकेच प्रेरणादायी -अपर्णा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

जालना : आयुष्याचा मार्ग निवडताना आपण जसा विचार करतो, तसाच संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकांचा केला पाहिजे, तेव्हाच परिवर्तन होते, ...

जालना : आयुष्याचा मार्ग निवडताना आपण जसा विचार करतो, तसाच संस्कारक्षम विचार रुजविण्यासाठी पुस्तकांचा केला पाहिजे, तेव्हाच परिवर्तन होते, असे प्रतिपादन प्राचार्या अपर्णा पवार यांनी केले. गुरुवारी साने गुरुजी जयंतीनिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.

शहरातील श्रीमती दानकुंवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जालना शाखेतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या अपर्णा पवार या होत्या. यावेळी साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदावर्ते, जिल्हाप्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी, उपाध्यक्ष प्रा. दिगंबर दाते, कोषाध्यक्ष संतोष लिंगायत, कवी कैलास भाले, रामदास कुलकर्णी, पांडुरंग वाजे, संदीप इंगोले, उमाकांत बोमनाळे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्राचार्या पवार म्हणाल्या, आज सर्व घटकांतील वातावरण बदलले आहे. युवतींनी आपली आयुष्याची दिशा ठरविताना प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची संगत धरली पाहिजे. मुलींनी आत्मविश्वासपूर्ण परिस्थितीचे आकलन करून पुढे जावे, असा सल्लाही पवार यांनी दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी यांनी साने गुरुजी कथामालेच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमात साने गुरुजी कथामालेच्या सहकार्याने देण्यात आलेल्या पुस्तकांचा संच विद्यालयास देण्यात आला. सूत्रसंचालन रोहिणी कुलकर्णी व किरण शर्मा यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका शुक्ला, सतीश संचेती, देशपांडे, सानप यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

फोटो

जालना : शहरातील श्रीमती दानकुंवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्या अपर्णा पवार, आर. आर. जोशी, डॉ. सुहास सदावर्ते, प्रा. दिगंबर दाते आदी.