चैतन्य तुपेचा शोध लागला! अपहरणकर्त्यांच्या गाडीचा अपघात, पोलिसांनी सोडला नाही पिच्छा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:26 IST2025-02-05T15:26:32+5:302025-02-05T15:26:56+5:30

चैतन्य तुपे अपहरण प्रकरणात मोठी घडामोड

Big news! Chaitanya Tupe found; Kidnappers' car crashes, police not giving up on chase | चैतन्य तुपेचा शोध लागला! अपहरणकर्त्यांच्या गाडीचा अपघात, पोलिसांनी सोडला नाही पिच्छा 

चैतन्य तुपेचा शोध लागला! अपहरणकर्त्यांच्या गाडीचा अपघात, पोलिसांनी सोडला नाही पिच्छा 

- फकिरा देशमुख
भोकरदन ( जालना) :
छत्रपती संभाजीनगर येथून चैतन्य सुनिल तुपे या सात वर्षीय  मुलाला अपहरण करून घेऊन जात असलेल्या गाडीला मंगळवारी, 4 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता आसई पाटीजवळ अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या प्रणव समाधान शेवत्रे याला नागरिकांनी पकडून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आणले व पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र चार अपहरणकर्त्यांनी रात्री दुसरी गाडी बोलावून घेत चैतन्यला घेऊन चिखलीकडे पोबारा केला. दरम्यान, मागावर असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस पथकास अपहरणकर्ते ब्रम्हपुरी येथे सापडले आहेत. मुलाला पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. 

अपहत मुलाला घेऊन फुलंब्री, हासनाबाद, भोकरदन, मार्गे जाफराबादकडे भरधाव वेगाने जात असताना 4 फेब्रुवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान आसई पाटीजवळ भाजीपाला भरण्यासाठी उभ्या असलेल्या एका गाडीला जोरात धडक दिली. यात अपहरणकर्त्यांच्या गाडीचा चुराडा झाला. मात्र, जखमी असलेल्या आरोपींनी  अंधाराचा फायदा घेऊन मुलासह शेजारच्या शेतात पळ काढला. यावेळी ज्यांच्या गाडीला यांनी धडक दिली त्या गजानन भावले ( रा वालसा  वडाळा) यांनी यातील प्रणव समाधान शेवत्रे ( रा. ब्रम्हपुरी ता जाफराबाद) याला पळून जात असताना पकडून ठेवले. त्यानंतर त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे चैतन्यचे अपहरणकर्ते समोर आले आहेत. अद्याप चैतन्यचा शोध लागला नाही. भोकरदन ग्रामीण रुग्णालयात चैतन्यच्या नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे पोलिसांनी प्रणव शेवत्रे याला भोकरदन पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. जालन्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली आहे.

अपहरणकर्ते जाफराबाद येथील
पोलिसांच्या ताब्यात मिळाला नव्हता मात्र तयाच्या सोबत असलेल्या अपहरण कर्त्यांची नावे प्रणव शेवत्रे याने पोलिसांना हर्षल शेवत्रे, ज्ञानेश्वर शेवत्रे, जीवन नारायण शेवत्रे सर्व ( रा ब्रम्हपुरी ता जाफराबाद) येथील असल्याचे सांगितले, हे आरोपी छत्रपती संभाजी नगर येथे काम करतात तर एक पुण्याला असतो तर प्रणव हा छत्रपती संभाजी नगर येथील छत्रपती विद्यालयात बीसीएस प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.

अपहरणकर्ते चिखलीत आढळले
भोकरदन ग्रामीण रुग्णालयात छत्रपती संभाजी नगरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी संदिप गुरमे, भोकरदनचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे, पोलिस उपनिरीक्षक  सागर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक पवन राजपूत यांनी प्रणव शेवत्रे याचा जवाब घेतला. त्यानुसार पोलिस अधिकारी व पथक मुलाचा शोध घेण्यासाठी चिखली जिल्हा बुलडाणाकडे रवाना झाले आहेत. आरोपी यांनी चिखली येथे औषधी घेत असल्याचे  समोर आले आहे. 

दोन नंबर प्लेटचा वापर
छत्रपती संभाजीनगर येथून मुलाचे अपहरण करताना आरोपींनी गाडीला एमएच 25 1126 या क्रमांकाची नंबर प्लेट वापरली. तर अपघात झाला तेव्हा गाडीला एमएच 20 ई ई 7126  ही नंबर प्लेट वापरली आहे. वास्तविक ही गाडी छत्रपती संभाजी नगर येथे गाडी मालकाच्या घरासमोर उभी आहे. 

Web Title: Big news! Chaitanya Tupe found; Kidnappers' car crashes, police not giving up on chase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.