शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पीडित महिलांना ‘मनोधैर्य’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जालना : अत्याचारपीडित महिला, मुलींचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडून ‘मनोधैर्य’ योजना राबविली जात आहे. कोरोनातील पहिले दोन महिने वगळता जिल्हा ...

जालना : अत्याचारपीडित महिला, मुलींचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडून ‘मनोधैर्य’ योजना राबविली जात आहे. कोरोनातील पहिले दोन महिने वगळता जिल्हा विधि सेवा प्राधिकरणअंतर्गत असलेल्या समितीच्या सर्वच बैठका नियमित घेण्यात आल्या असून, शासनाची ही मनोधैर्य योजना पीडित महिला, मुलींसाठी आधार ठरत आहे.

अत्याचारपीडित, ॲसिड हल्ल्यातील जखमी महिला, मुलींचे पुनर्वसन करण्यासाठी शासनस्तरावरून मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेंतर्गत दाखल अर्जानुसार पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत केली जाते. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने हा निधी दिला जातो. शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्यानंतर प्रारंभीच्या कालावधीत ही योजना महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात आली. या विभागाकडे येणाऱ्या अर्जांची छाननी करून पीडितांना शासकीय नियमानुसार मदत केली जात होती. त्यानंतर सन २०१७ पासून ही मनोधैर्य योजना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिले दोन महिने बैठक झाली नाही. मात्र, नंतरच्या काळात या समितीने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बैठक घेऊन येणाऱ्या अर्जांची छाननी केली आहे. छाननीनंतर मंजूर अर्जांनुसार पीडितांना विधि सेवा प्राधिकरणाकडून शासकीय निधीचे वितरण करण्यात आले आहे.

...अशी होते मदत

अत्याचारपीडित, ॲसिड हल्ल्यातील जखमी, पोक्सोमधील पीडितांचे पुनर्वनन करणे गरजेचे असते. त्यामुळे शासनाकडून या पीडितांना आर्थिक मदत केली जाते. घटनेनंतर त्यांचे पुनर्वसन करणे, आरोग्याची सुविधा पुरविणे, समुपदेशन करणे याबाबीही महत्त्वाच्या असतात. त्यादृष्टीनेही शासनाने विविध स्तरांवर समित्या गठित केल्या आहेत.

पाच सदस्यीय समिती अर्जांची करते छाननी

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणकडून मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी केली जाते. यासाठी नियुक्त समितीत प्राधिकरणाचे अध्यक्ष, पोलीस अधीक्षक, आरोग्य विभागाचे अधिकारी, प्राधिकरणचे सदस्य सचिव व एक सामाजिक संस्थेचे अशासकीय सदस्य असतात. या समितीतील सदस्य बैठकांमध्ये अर्जांची पाहणी करून अंतिम निर्णय घेत असतात.

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणच्या सदस्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातही अनेकांना घरपोच धान्य किटचे वाटप केले आहे. त्याशिवाय बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही किटचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनात राज्यातील सर्वांत चांगले काम करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जालना जिल्ह्याचाही समावेश होतो.

अत्याचारपीडित, ॲसिड हल्ल्यातील पीडितांसाठी शासनाकडून मनोधैर्य योजना राबविली जात आहे. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणकडे ही योजना हस्तांतरित करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय नियुक्त समिती सदस्यांची प्रत्येक महिन्याला नियमित बैठक होत आहे. शासनाने दिलेले निर्देश व कायद्यांचे पालन करून समितीचे कामकाज सुरू आहे. त्याशिवाय जिल्हा विधि सेवा प्राधिकरणने कोरोनाच्या काळातही अनेकांना धान्य किटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे समिती सचिवांनी सांगितले.