संतमहंतांचे आशीर्वाद घेऊनच निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार : अशोकराव चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 16:50 IST2019-02-07T16:48:15+5:302019-02-07T16:50:22+5:30
परतुर (जालना ) : संतमहंतांचे आशीर्वाद घेऊनच आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. शहरात ...

संतमहंतांचे आशीर्वाद घेऊनच निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार : अशोकराव चव्हाण
परतुर (जालना ) : संतमहंतांचे आशीर्वाद घेऊनच आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
शहरात आयोजित रामकथा व कीर्तन सोहळ्यास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज भेट दिली. यावेळी चव्हाण म्हणाले की, आम्ही संत महंताचे आशीर्वाद घेऊनच आगामी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार आहोत. संत महंतांनी दाखवलेला मार्ग आमचा राजमार्ग व्हावा. राजकारणात चढ़ उतार होत असतात. आज मी केवळ आपले आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, आम्ही जे काम करू त्याला आपल्या आशीर्वादाची गरज आहे. आम्ही संतांच्या आशीर्वादाची शिदोरी घेऊनच पुढे जाणार आहोत, असेही खा. चव्हाण म्हणाले.
याप्रसंगी माजी आमदार जेथलिया म्हणाले की, मी राजकारणी आहे, धार्मिकता, लोकसंग सोडला नाही. आपला विश्वास, प्रेम कायम ठेवा तो सार्थ करुन दाखवू. यावेळी माजी खा एकनाथ गायकवाड़, माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, राजेंद्र देशमुख, मंजूषा देशमुख, नगराध्यक्षा विमल जेथलिया, सभापती कपिल आकात, विजय राखे, रमेश सोळके, नितिन जेथलिया आदींची उपस्थिती होती.