समृद्धीवर चालकाचा ताबा सुटूल्याने कारची ट्रकला धडक, चिमुकल्यासह चार जण जखमी
By दिपक ढोले | Updated: March 28, 2023 17:17 IST2023-03-28T17:16:47+5:302023-03-28T17:17:37+5:30
या अपघातात कारच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

समृद्धीवर चालकाचा ताबा सुटूल्याने कारची ट्रकला धडक, चिमुकल्यासह चार जण जखमी
जालना : चालकाचा ताबा सुटल्याने कारने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याची घटना नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावरील कॉरिडॉर क्रमांक ३५९ वर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. यात पाच जण जखमी झाले आहेत. अजिंक्य अभ्यंकर (३२), रणजित अभ्यंकर (२८) श्रुतिका अभ्यंकर, सोनल नितीन शेळके (३२), अद्विक नितीन शेळके (५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
अजिंक्य अभयंकर हे पाच जणांसोबत कारने क्रमांक (एमएच.२७.डी.ए. १८७४) नागपूरकडे जात होते. कॉरिडॉर क्रमांक ३५९ वर आल्यावर चालकाचा ताबा सुटून भरधाव कार, ट्रक क्रमांक (यूपी.७२.टी. २३९८) ला पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. तर कारचालक अजिंक्य अभ्यंकर, रणजीत अभ्यंकर, श्रुतिका अभ्यंकर, सोनल नितीन शेळके, अद्विक नितीन शेळके हे जखमी झाले आहेत. याची माहिती महामार्ग पोलिसांना देण्यात आली. महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल जाधव हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना जालना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.
तर ट्रकचालक श्यामलाल कन्हैयालाल यादव (६०), रवी प्रतिपाल यादव (१९, दोघे रा. निवरा, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिसांनी सदरील कार क्रेनच्या साहाय्याने समृद्धीच्या कार्यालयाजवळ आणली आहे, याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली होती.