जालन्यात राज्य राखीव पोलिस दलाच्या ऑनड्युटी जवानाने गोळी झाडून संपवले जीवन
By दिपक ढोले | Updated: September 30, 2023 11:49 IST2023-09-30T11:48:55+5:302023-09-30T11:49:17+5:30
घटनेची माहिती सदर बाजार पोलिसांना देण्यात आली आहे.

जालन्यात राज्य राखीव पोलिस दलाच्या ऑनड्युटी जवानाने गोळी झाडून संपवले जीवन
जालना : शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील एका ४१ वर्षीय जवानाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सचिन भदरगे (४१ रा. जिंतूर) असे मयताचे नाव आहे.
सचिन भदरगे हे सकाळी ड्युटी करीत होते. त्याचवेळी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती सदर बाजार पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला आहे.