कोरोना योद्धयाचा अपघाती अंत; ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात डॉक्टरांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 17:35 IST2020-04-23T17:35:14+5:302020-04-23T17:35:41+5:30

परतूर शहरातील घटना ; रूग्णालयात जाताना घडली घटना

The accidental end of the Corona Warrior; Doctor dies on the spot in tractor-bike accident near Paratur | कोरोना योद्धयाचा अपघाती अंत; ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात डॉक्टरांचा जागीच मृत्यू

कोरोना योद्धयाचा अपघाती अंत; ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात डॉक्टरांचा जागीच मृत्यू

परतूर : भरधाव ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने एका दुचाकीस्वार वैद्यकीय अधिकाऱ्याचा (डॉक्टर) मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी परतूर (जि.जालना) शहरातील स्मशानभूमीजवळ घडली.

डॉ. फारूक सय्यद आय्यूब सय्यद (५० रा. वरफळ ता. परतूर) असे मयत वैद्यकीय अधिका-याचे नाव आहे. डॉ. फारूक सय्यद हे माहोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर होते. डॉ. सय्यद हे गुरूवारी सकाळी त्यांच्या दुचाकीवरून भोकरदन येथील शासकीय रूग्णालयात जात होते. त्यांची दुचाकी परतूर शहरातील स्मशानभूमीजवळ आली असता भरधाव ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या डॉ. सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. 

मयताच्या पार्थिवाचे परतूर येथील शासकीय रूग्णालयात डॉ. प्रशांत अंभुरे यांनी शवविच्छेदन केले. मयत डॉ. सय्यद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वरफळ येथे अंत्यविधी करण्यात आले.

Web Title: The accidental end of the Corona Warrior; Doctor dies on the spot in tractor-bike accident near Paratur