७ मार्चला राज्यभरात आक्रोश मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:28 IST2021-02-20T05:28:55+5:302021-02-20T05:28:55+5:30
पानेवाडी येथे कीर्तन जालना : शिवजयंतीनिमित्त पानेवाडी येथे शनिवारी रात्री ८ वाजता प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला पाटील यांचे ...

७ मार्चला राज्यभरात आक्रोश मेळावा
पानेवाडी येथे कीर्तन
जालना : शिवजयंतीनिमित्त पानेवाडी येथे शनिवारी रात्री ८ वाजता प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला पाटील यांचे कीर्तन होणार आहे. या कीर्तनास परिसरातील भाविक-भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कुंभार पिंपळगावात ३० जणांचे रक्तदान
कुंभारपिंपळगाव : येथे शिवजयंतीचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० दात्यांनी रक्तदान केले. उद्घाटन पोनि. शिवाजी बंटेवाड यांनी केले. या वेळी पोउपनि. एस. एस. बहुरे, रामदास केंद्रे, रामेश्वर लोया, डिगांबर आर्दड, ज्ञानेश्वर आर्दड, बापूसाहेब आर्दड, रमेश तौर, श्रीरंग गुजर, गणेश तौर, व्ही.एन. शेळके, आर.एन. झंवर आदी उपस्थित होते.
डाॅ.प्रभाकर शेळके यांना एकता साहित्य पुरस्कार
जालना : येथील कवी तथा कथाकार डॉ.प्रभाकर शेळके यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह व्यवस्थेचा बइल एकता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रभाकर साळेगावकर, अनंत कराड, राजकुमार तांगडे यांची उपस्थिती होती. याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे, मनिषा टोपे, डॉ.बी.आर. गायकवाड, डाॅ.आर.जे. गायकवाड आदींनी स्वागत केले.
प्रतिष्ठानकडून आंदोलनाचा इशारा
अंबड : शेतकऱ्यांची तोडलेली शेतीपंपाची वीज जोडणी येत्या चार दिवसांत पूर्ववत करण्यात यावी, अन्यथा श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानतर्फे शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरणच्या कार्यालयासमोर अर्धनग्न बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जयसिंग शेळके, महेश जाधव, पांडुरंग सावंत, गोविंद शर्मा, हर्षल देशमुख, बाबा पौळ, जगन राऊत, ॲड.कृष्णा शेरे आदींनी दिला आहे.
अध्यक्षपदी द्वारकादास बजाज यांची नियुक्ती
जालना : तालुक्यातील नेर येथे व्यापाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब, जगन्नाथ थोटे, प्रवीण मोहता यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी द्वारकादास बजाज, उपाध्यक्ष कैलास उफाड, सचिव नारायण सहाने यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन प्रताप पाईकराव यांनी केले.
वाहन चालविताना खबरदारी घ्यावी
जालना : रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहन चालवताना हेल्मट, सीट बेल्ट वापरणे, तसेच वाहन कायदा नियमाचे पालन करून वाहने चालवावी. रात्री वाहन चालविताना अप्पर डिप्परचा वापर योग्य रीतीने करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले. ३२वे राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आरटीओ कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ.प्रदीप हुसे यांनी अपघात झाल्यावर प्रथम उपचार कसे करावे, याबद्दल मार्गदर्शन केले.
रोहिलागड येथे कोरोना योद्ध्याचा सत्कार
अंबड: रोहिलागड येथे काेविड १९ उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून गौरव केला. यावेळी रोहिलागड केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे, शिवसंग्रामचे उपाध्यक्ष नारायण टकले, तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष शेख मुंतजीर तांबोळी, किशोर टकले प्रल्हाद जाधव, रमेश मगरे, सदस्य पांडुरंग टकले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर टकले यांनी केले. त्यानंतर, इतर मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.