समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकवर जीप धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 15:31 IST2023-06-08T15:31:09+5:302023-06-08T15:31:52+5:30
दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकवर जीप धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
- शिवाजी कदम
जालना: बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार जवळ समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
गुरूवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास येथे अब्दुल मोहम्मद खालिद शेख(२०),मोहम्मद शारुक(२२), साद्रिक हुसेन (४२) असे तिघे जण जीपमधून मुंबईहून नागपूरकडे निघाले होते. दरम्यान, बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजारजवळ उभ्या असलेल्या ट्रकला यांचे वाहन धडकले. यामध्ये अब्दुल मोहम्मद खालिद शेख जागीच ठार झाले. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णवाहिकेतून आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज वाळके, चालक शिवाजी बनकर, पोलीस रवि पवार, गणेश चव्हाण यांनी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.