विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 10:14 IST2025-05-12T10:13:58+5:302025-05-12T10:14:59+5:30

धुळे सोलापूर महामार्गावरील बारस वाडा फाटा येथील घटना

A car was hit by a speeding vehicle coming from the opposite direction; Two killed, five seriously injured in a horrific accident on Dhule Solapur Highway, in Jalna District | विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर

विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर

- पवन पवार 

लोकमत न्यूज नेटवर्क 

वडीगोद्री : विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या हायवाने समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात परप्रांतीय दांपत्य जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री ११:३० च्या दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाटा येथे घडली. हा अपघात एवढा भीषण होता की जेसीबीच्या सहाय्याने  मृतदेह बाहेर काढण्यात आले.

हैदराबादहून शिर्डी देवदर्शनासाठी जात असताना भाविकांवर काळाचा घाला झाला. या अपघातात जी रामू वय ४५,जी माधुरी वय ४० दोघेही रा. हैद्राबाद जागीच ठार झाले असून श्रीवाणी ४१, अनुषा १७, मेघना १२, ऋषिका ०७, नागेश्वर राव ४५ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हैदराबाद येथील कुटुंब शिर्डी येथे दर्शन करण्यासाठी किया कॅरेन्स गाडी क्रमांक टी जी ०८ क्यू ०५५८ हैदराबाद हून  ७ जण कारने रविवारी दुपारी १२ वाजता निघाले होते. शिर्डीकडे जाण्यासाठी प्रवास करत असताना धुळे सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या विना नंबरच्या भरधाव हायवाची व कारची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत परप्रांतीय दांपत्य जागीच ठार झाले असून कारमधील इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी येऊन मदत कार्य सुरू केले. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील मृतदेह व जखमींना जेसीबीद्वारे बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती कळतच घटनास्थळी महामार्ग 52 ची १०३३ रुग्णवाहिका व मदतनीस यांनी येऊन मृतदेह व जखमींना बाहेर काढले. जखमी झालेल्याना रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.  या अपघातामुळे परप्रांतीय कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: A car was hit by a speeding vehicle coming from the opposite direction; Two killed, five seriously injured in a horrific accident on Dhule Solapur Highway, in Jalna District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात